Photo : दाओसमध्ये राज्याला मिळाली 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक
दाओसमध्ये (Davos) पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला (Maharashtra) 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली.
स्वित्झर्लंड येथील डाव्होस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (World Economic Forum) विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)हे देखील उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
दाओस (Davos) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे यांची उपस्थिती
आजपासून दावोस परिषदेला सुरूवात झाली. ही परिषद पाच दिवस चालणार आहे.
जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) दाओस परिषद महत्त्वाची आहे
महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.