Shelwa Waterfall : तळकोकणात फेसळणारा शेवळा धबधबा पर्यटकांनी बहरला, पाहा फोटो
साधारणपणे 300 ते 350 फुटांवरुन मनमुरादपणे कोसळणारा पांढरा शुभ्र शेळवा धबधबा पर्यटकांना सध्या भुरळ घालत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुडाळ तालुक्यातील घोडगे गावात गेल्यावर उंच डोंगरात सहज नजरेस पडणारा हा शेळवा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ सध्या सुरु आहे.
गावातून जंगलातील रानवाटने डोंगर कपारीतून वाट काढत दोन ते तीन तास प्रवास करत या शेळवा धबधब्या जवळ जाता येते.
हा धबधबा तीन टप्यात विभागला गेला आहे.
सह्याद्रीच्या पट्ट्यात उंचावरून कोसळणारा शेळवा धबधबा 300 ते 350 फुटांवरून खाली कोसळतो, त्यांनतर काही अंतरावर खाली १०० फुटांवरून दुसऱ्या टप्प्यात हा धबधबा कोसळतो.
तसेच त्यानंतर हा धबधबा पुढे गड नदीला जाऊन मिळतो.
त्यामुळे सर्वात उंचावरुन कोसळणारा हा धबधबा सिंधुदुर्गातील शेळवा धबधबा म्हणून प्रचलित आहे.
ट्रेकिंग करत तसेच मध्ये असणाऱ्या ओहोळातुन वाट काढत या धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते.
त्यामुळे हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.