Andheri Traffic Jam : पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीजवळ वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाखाली वाहनांच्या रांगा
14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जारी केली होती
Western Express Highway Traffic Jam
1/8
अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येत आहे.
2/8
अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरु आहे.
3/8
त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्याने पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती.
4/8
14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जारी केली होती
5/8
मात्र काम उशिरापर्यंत सुरु असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
6/8
या वाहतूक कोंडमध्ये अॅम्ब्युलन्स देखील अडकली होती.
7/8
सोमवार असल्याने बोरिवली इथून मुंबईकडे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे.
8/8
हे काम अजून काही वेळ सुरु राहणार असून लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Published at : 14 Aug 2023 08:08 AM (IST)