Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg News : तळकोकणातील वेंगुर्ल्यात भरला रानभाज्यांचा उत्सव, पारंपारिक रानभाज्यांना आधुनिकतेचा टच
पूर्वीच्या काळी रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट केल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र आताच्या आधुनिक युगात रानभाज्यांचा आहारामध्ये फारसा समावेश नसतो.
रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट व्हाव्यात या हेतूने सिंधुदुर्गात रानभाज्यांचा उत्सव भरवण्यात आला आहे.
या उत्सवामध्ये ग्रामीण भागातील 60 सदस्यांनी सहभाग घेतला.
रानभाज्यांचे प्रदर्शन या माध्यमातून भरवण्यात आले होते.
तसेच अनेक रानभाज्यांपासून विविध पदार्थ देखील बनवण्यात आले होते.
लाजरीची कडी, कंगुना भाजीचे वडे, एरंडाचे सरबत, आघाडा मोमोज, पेवग्याची वडी, पुनर्नवा भजी, भरलेली करडूले, निवडुंगाचे पातोळे असे विविध पदार्थ रानभाज्यांपासून बनवण्यात आले होते.
या माध्यमातून रानभाज्यांपासून विविध प्रयोग करण्याचा प्रयत्न महिलांनी केला आहे.
तसेच यामुळे रानभाज्यांना आधुनिक टच देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे.