Nandurbar Dam : नंदुरबारमधील दरा धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
सातपुड्यातील डोंगररांगांमध्ये होणाऱ्या पावसामुळे दरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच पर्यटकांनी नदीपात्रात किंवा धरणाच्या सांडव्याजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील वाकी नदीवर बांधण्यात आलेल्या दरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
या परिसरात असलेली हिरवळ आणि वनविभागाने जगवलेली जंगले यामुळे या धरणावर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते.
दरवर्षी अनेक पर्यटक या दरा प्रकल्पाला भेट देत असतात.
पण राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकल्प यंदा मोठ्या प्रमाणावर ओव्हरफ्लो झाला आहे.
तसेच हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाढत्या पावसाचा अंदाज घेत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
त्यामुळे पर्यटकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आली आहे.