Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Sindhudurg News : तळकोकणच्या किनाऱ्यालगत 'किलर व्हेल' प्राण्याचे दर्शन, मच्छिमार आणि पर्यटकांमध्ये कुतूहल
सागरी जैवसाखळीतील सर्वात मोठा डॉल्फिन आणि शिकारी सस्तन प्राणी म्हणून हा जीव ओळखला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमुद्री जैवसाखळीत महत्वाचे स्थान असणारा 'किलर व्हेल' हा सागरी सस्तन प्राणी असून त्याच्या काळ्या शरीरावर उमटलेल्या पांढऱ्या डागांमुळे सर्वपरिचित आहे. मात्र या माश्याचे दर्शन राज्याच्या सागरी किनाऱ्यावर तसे दुर्मिळ आहे.
गेल्या काही दिवसांपासून या सागरी माश्याचे दर्शन राज्याच्या किनारपट्टीलगत घडत आहे. 2019 साली सर्वप्रथम पूर्णगड येथील मच्छीमारांना गावखडी गावाच्या किनारपट्टीनजीक 'किलर व्हेल'चे दर्शन घडले होते.
गेल्या काही दिवसांपासून या सागरी माश्याचे दर्शन राज्याच्या किनारपट्टीलगत घडत आहे. 2019 साली सर्वप्रथम पूर्णगड येथील मच्छीमारांना गावखडी गावाच्या किनारपट्टीनजीक 'किलर व्हेल'चे दर्शन घडले होते.
किलर व्हेल हा समूहाने शिकार करणारा मासा आहे. एका समूहात साधारण 40 पर्यंत किलर व्हेल असतात.
50 ते 80 वर्षांपर्यंत जगणाऱ्या या प्राण्याचा आकार 23 ते 32 फुटांपर्यत असतो.
त्याच्या पाठीवरील मोठा काळा पर ही या जीवाची ओळख खूण आहे. त्याचे वजन सहा टनांपर्यत असते. कोकणच्या खोल समुद्रात या सागरी माष्याचा वावर असून त्यासाठी हा समुद्र पोषक वातावरण आहे.
देवबाग आणि वेंगुर्ला येथील खोल समुद्रात त्यांचे दर्शन घडते. मात्र किनारपट्टीनजीक हा जीव फारच कमी पाहण्यास मिळतो.
एका पिल्लाला जन्म देऊन मादी त्याचा दोन वर्षांपर्यंत सांभाळ करते. बहुतांश वेळा जन्मास आलेले पिल्लू त्याच गटामध्ये शेवटपर्यंत राहते.
डॉल्फिन प्रमाणे किलर व्हेल ही वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात.