Pune SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन गट आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे भाजपकडून आंदोलन करण्यात येत होतं. याच आंदोलनात दोन विरोधी संघटना आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला आहे. दोन गटांमध्ये बाचाबाचीदेखील झाली आहे.
पुणे भाजप युवा मोर्चा आणि स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. काही वेळ पुणे विद्यापीठात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पोलिसांकडून या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दोन्ही गट आक्रमक झाल्याने दोन्ही गटाची कार्यकर्ते पोलिसांचं ऐकण्याच्या तयारी दिसत नाही आहे शिवाय पुणे भाजप युवा मोर्चाच्यावतीने काही डाव्या संघटनेचे झेंडेदेखील जाळण्यात आले आहे.
त्यामुळे डाव्या संघटनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहे. दोन्ही गटांमध्ये तुफान धक्काबुक्की झाली आहे.
एका गटाकडून जय भीम तर दुसऱ्या गटाकडून वंदे मातरम् च्य़ा घोषणा दिल्या जात आहे. यात महिला कार्यकर्त्यांचादेखील समावेश आहे. महिलां कार्यकर्त्यांमध्येही जोरदार राडा झाला आहे.
महिलांना हात लावता, तुमच्या पुरुषांना लाजा वाटत नाही, असा आरोप डाव्या संघटनेकडून केला जात आहे.
त्याविरोधात भाजपच्या महिलादेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.