Black Panther: आंबोली घाट परिसरात काळ्या रंगाच्या बिबट्याचा अधिवास; पाहा फोटो
सह्याद्रीच्या पट्ट्यात असणाऱ्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील आंबोलीत काळ्या रंगाचा बिबट्या दिसला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंबोलीत गुरुवारी (24 ऑगस्ट) काळ्या बिबट्याचं दर्शन घडलं.
कोल्हापूरचे मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना बिबट्या दिसला.
याआधी आंबोलीजवळील चौकुळ गावात देखील काळा बिबट्या दिसल्याची नोंद आहे.
2014 साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती.
बिबट्याच्या वास्तव्यामुळे संपूर्ण पश्चिम घाटामध्ये आंबोलीतील जैवविविधता संपन्न असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे.
आंबोली घाटातील जंगल परिसरात काळा बिबट्या पाण्याला आला होता.
काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो.
मात्र त्यात मेलानिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो.
सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर अस्तित्व असल्याने आंबोलीचं जंगल किती समृद्ध आहे हे अधोरेखित होतं.