Savdav Waterfall : हिरवागार निसर्ग आणि फेसाळणारं पाणी, सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांनी बहरून गेल्याचं चित्र दिसून आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा आज जोर जरा कमी होता.
परिणामी पर्यटकांनी आज घराबाहेर पडून वीकेंड एन्जॉय केला.
सिंधुदुर्गातील सावडाव, आंबोली, मांगेलीसह सर्व धबधबे गर्दीने फुलून गेले होते.
अतिशय सुरक्षित असलेल्या सावडाव धबधब्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक वीकेंडला येत असतात.
आजही सावडाव धबधब्यावर जिल्हयातील स्थानिक पर्यटकांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटक दाखल झाले होते.
सावडावच्या धबधब्यावर आलेल्या पर्यटकांनी मनमुरादपणे आंघोळीचा आनंद घेतला.
अतिवृष्टीमुळे धबधब्याकडे पाठ फिरविलेल्या पर्यटकांनी आज वीकेंडला मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे पर्यटन व्यावसायिक ही सुखावून गेलेले दिसून आले.
पावसाळ्यात निसर्गाचा अनंद घ्या, मात्र, खबरदारी बाळगा. बंदी असलेल्या ठिकाणी जाण्याची चूक करु नका.
पावसाचा जोर वाढल्यास दुर्घटना घडण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.