Weekly Horoscope 24 July to 30 July 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी ठरणार भाग्याचा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा कष्टाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. व्यवहार करताना काळजी घ्या. मोठा करार करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि चांगले अन्न खा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैसा जास्त खर्च होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद सुरू असेल, तर तो लवकर सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. या आठवड्यात पोटाच्या संबंधित आजार उद्भवू शकतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहींना अस्वस्थ वाटेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुम्ही नोकरीच्या शोधात फिरत असाल तर तुमचा शोध पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या नोकरीची संधी मिळेल. कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात घरी पूर्ण वेळ द्याल आणि नोकरीतही प्रामाणिकपणे काम कराल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचं उत्पन्न वाढेल.
हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी नशीब घेऊन येईल. कार्यक्षेत्रात तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला एखाद्याकडून सरप्राईज मिळण्याचीही संधी आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्यात चढ-उताराची स्थिती राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात मोठे निर्णय घेणे टाळा.
सिंह राशीच्या लोकांची या आठवड्यात सर्व समस्या दूर होतील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल. या आठवड्यात परदेशात शिक्षण घेण्याचे तुमचे दीर्घकाळ रखडलेले स्वप्न साकार होऊ शकते. काही चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. जुन्या समस्या कमी होतील पण संपणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. तुम्ही हंगामी आजारांपासून दूर राहा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बॉसकडून तणाव जाणवू शकतो. काळजी घ्या आणि तक्रार करण्याची संधी देऊ नका. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. कामाचा ताण जास्त राहील. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील. कुटुंबातील कोणाशी सुरू असलेला वाद दूर होऊ शकतो. या आठवड्यात व्यवसायासाठी प्रवास करू शकता. ऑफिसमधील लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. नोकरी करणाऱ्या लोकांकडे उत्पन्नाचे साधन असावे. प्रेम जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वैवाहिक जीवनात काही कारणास्तव तणाव वाढू शकतो.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सर्व समस्यांवर मात करणारा ठरेल. जे बेरोजगार आहेत आणि बर्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास संभवतो. व्यापारी आपले काम वाढवू शकतात. तुमचाही मोठा व्यवहार होऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
या आठवड्यात धनु राशीच्या लोकांची नियोजित कामे पूर्ण होतील. कोर्टात सुरू असलेल्या कामात निर्णय तुमच्या बाजूने होईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुम्हाला उच्च पद मिळू शकते. प्रेमसंबंधात जोडीदाराशी एकनिष्ठ राहा. हंगामी आजारांपासून दूर राहा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत बाहेर फिरायला जाण्याचा योग येईल.
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आर्थिक लाभाबरोबरच नुकसानकारक सुद्धा ठरू शकतो. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कठीण स्पर्धेचा आहे. मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही छोट्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. व्यावसायिक व्यवहार करताना काळजी घ्या. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच करा.
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात स्वतःबद्दल विचार करा.
मीन राशीच्या लोकांच्या नवीन आठवड्यात सर्व इच्छा पूर्ण होतील. मुलांशी संबंधित जी चिंता होती ती दूर होईल. जे नोकरी करतायत, त्यांचा कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. राजकारणात जे सक्रिय आहेत त्यांच्यासाठी लवकरच मोठी संधी निर्माण होईल. या आठवड्यात तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा तुमच्या आयुष्याशी संबंधित तुम्ही जो निर्णय घ्याल तो नीट विचारपूर्वक आणि घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या सहमतीनेच घ्या.