Lonavala : जिकडे तिकडे नुसतेच पर्यटक; वाहनांच्या सहा किलोमीटरपर्यंत लांबच-लांब रांगा
पुणे, मुंबईसह लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे लोणावळा, खंडाळा, माथेराण या ठिकाणी वीकेंड साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवार, रविवार अशा सलग दोन सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.
या ठिकाणी बंदी असतानाही अनेक पर्यटक येत आहेत.
सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यातीलच नव्हे तर राज्यभरातील पर्यटक लोणावळ्यात आले आहेत.
यामुळे लोणावळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. लोणावळा ते भुशी धरणापर्यंत 6 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
लोणावळ्यामधून भुशी डॅम, टायगर, लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
लोणावळा पोलिसांवर या वाहतूक कोंडीचा ताण पडला आहे. बेशिस्त पर्यटकांमुळे अन्य पर्यटकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.