Sachin Tendulkar Birthday : ना फॉरेन, ना युके... बड्डेला धरली कोकणाची वाट; गप्पा-गाण्यांची मैफिल ते मालवणी पदार्थांवर ताव...
आक्ख जग तुम्हाला 'क्रिकेटचा देव' मनातं, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपण अव्वल स्थानावर आहोत...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसं असताना साहजिकच वाटेल आपला 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कधी स्वप्नवत विचार केलाही नसेल असं सेलिब्रेशन आपण करू शकतो, 'पैश्याची कसली कमी नाही...' अगदी मनात आलं तर अवकाश चंद्र-तारेचं काय तर जगाला हेवा वाटेल असं काहीही करता येऊ शकतं...
असं असताना साहजिकच वाटेल आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कधी स्वप्नवत विचार केलाही नसेल असं सेलिब्रेशन आपण करू शकतो, 'पैश्याची कसली कमी नाही...'
मात्र, या सगळ्या गोष्टीना फाटा देत क्रिकेट च्या देवाने सहकुटुंब वाट धरली ती थेट तळ कोकणातल्या परुळ्यात...
आणि खवय्या सचिनने अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर मारला यथेच्छ ताव...
भरलेला बांगडा, कोळंबी फ्राय, 'माशाचा मालवणी तिखला,' कोंबडी रस्सा, वडे-सागोती, गोलमा अशा अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर यथेच्छ ताव मारत 'क्रिकेटच्या देवा'ने अर्थात खवैय्या सचिन तेंडुलकरने या मालवणी भोजनाला दिलखुलास ताव मारला.
परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर आणि सचिनच्या मित्रांनी भेट दिल्याचं पाहायला मिळालं
आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भोगवे गावात आलेल्या सचिनने खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
आणि खवय्या सचिनने अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर मारला यथेच्छ ताव...
शाकाहारी पदार्थांमध्ये आमरसासह हापूस आंबे तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, कंद मुळाची भाजी..
काजू-शहाळ्याची भाजी, भात, सोलकढी, निरफणसाची कापे, बोंडू रायता अशा पदार्थांचीही यावेळी रेलचेल होती.
सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला.
तश्याच पद्धतीचा लूक हॉटेल ला देऊन बनवलेलं हे माचली रेस्टॉरंट. हे माचली रेस्टॉरंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावात आहे.
याच माचली रेस्टॉरंटमध्ये सचिन तेंडुलकरनेही मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला.
सचिनचे कुटुंब आणि मित्र मिळून एकूण तीस जणांनी या पंक्तीत एकत्र जेवण घेतले.
सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला. सचिनने माचली रिसॉर्ट फिरून पाहिले आणि समाधान व्यक्त केले.
दिवसभर सचिन मित्रांच्या गराड्यात गप्पांमध्ये रमला होता, असा वाढदिवस कोणाला नकोय... सचिनची नाळ या आपली मातीत जुळली आहे, याचा प्रत्यय आलेला दिसला...