Surgana Akhati Gauri : पावसाळ्यापूर्वी बीज परीक्षण आणि शेती अवजारांचं पूजन, नाशकात आखाती गौरींचा उत्सव साजरा
Nashik Akhati Gauri : नाशकातल्या आखाती गौरींचा उत्सव शेतकऱ्यांचा पारंपारिक उत्सव आहे. नाशकातल्या सुरगाण्यात आखाती गौराई साजरी करण्याची परंपरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील डांग सीमावर्ती भागात 'आखाती गौराई ' सण उत्साहात साजरा करण्यात आला.
'आखाती गौराई ' सणाच्या निमित्ताने बीज परीक्षण आणि शेती अवजारांचे पूजन करण्यात आले.
सात दिवस अगोदरच गौराई घातली जाते, सात दिवसानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते.
या काळात पाच धान्य, भात, नागली, मका, तूर, उडीद यासह विविध प्रकारचे धान्य टोपलीत माती भरुन पेरले जातात.
त्या टोपलीत उगवलेल्या धान्यांच्या रोपांना गौराई म्हणतात. या प्रथेनुसार बीज परीक्षण केले जाते.
सात दिवसानंतर पारंपरिक पद्धतीने संबळ, कहाळ्या या वाजंत्रीने जल्लोषात गौराईची मिरवणूक काढली जाते.
गौराईच्या निमित्ताने पावसाळ्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध बियाणे कसे रुजणार याचा अंदाज घेतला जातो आणि गौराईचं विसर्जन करतात.
गौराईंच्या या संपूर्ण प्रक्रियेनंतर गौराई विसर्जन करतात. याच वेळी मिरवणूक काढण्यात येते.
सध्या सुरगाण्यात गौराईंचा उत्साह धूमधडाक्यात सुरु आहे.