IPL 2023 MI vs GT : रोहित शर्माची पलटन की हार्दिक पांड्याची फौज, कोण ठरणार वरचढ? नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना
16 व्या हंगामातील 35 वा सामना आज, 25 एप्रिलला गुजरातच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.
गुणतालिकेत चौथ्या क्रमांकाचा संघ गुजरात आणि सातव्या क्रमांकाचा संघ मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे.
सामन्याआधी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत. याचे फोटो समोर आले आहेत.
मुंबई संघडी अहमदाबादमधील नरेंंद्र मोदी स्टेडिअममध्ये सराव करताना पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि सुर्यकुरमार नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. तर फलंदाजही आगामी सामन्याची तयारी करत आहेत.
पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहेत. यजमान गुजरात संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील सहा सामन्यांपैकी चार विजय नोंदवून हंगामाची सुरुवात चांगली केली आहे.
गुजरात संघ सध्या आयपीएल 2023 गुणतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाहुण्या मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या सहा सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर तीन सामने गमावले आहेत. मुंबईं संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात (GT) आणि मुंबई (MI) या संघांमध्ये आतापर्यंत एकच सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यामध्ये मुंबई संघाने विजय मिळवला होता.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई आणि गुजरात संघ पहिल्यांदा आमने-सामने आले होते आणि हा सामना मुंबईने पाच धावांनी जिंकला होता.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन संघामध्ये 25 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.