Kokan Ganpati Festival: कोकणातही गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत, पारंपरिक पद्धतीनं गणपतीची विधिवत पूजा
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
19 Sep 2023 10:59 AM (IST)
1
कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोकणात घरोघरी गणपती बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
3
कोणी शेतीच्या बांधावरून डोक्यावर बाप्पांची मूर्ती घेऊन येत आहेत
4
तर कोणी होडीमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवून खाडी, नदी पार करून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत.
5
कोकणात आज बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेची लगबग घरोघरी पाहायला मिळत आहे.
6
सिंधुदुर्गात 71798 घरी बाप्पांचं आगमन होत आहे
7
मोठ्या भक्तिभावाने बापांची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.
8
गणपतीच्या आगमनाची चाहूल लागताच सारे कोकण उत्साही होऊन जाते.
9
गणपती आगमनाच्या काळात कोकणातील चाकरमानी गावी येतात.
10
कुटुंबातील सारेच एकत्र येऊन गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने, भक्तीभावनेने आणि उत्साहाने साजरा करतात.