FD Rates : ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 'या' स्मॉल बँका देत आहेत सर्वाधिक व्याज दर; पाहा यादी
Highest FD Rates for Senior Citizen: सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकांच्या मुदत ठेवींना आजही अनेकजण प्राधान्य देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविविध बँका आपल्या विविध वयोगटाच्या ग्राहकांना मुदत ठेवीवर वेगवेगळे व्याज दर ऑफर करतात.
काही स्मॉल बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 9.25 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत.
Equitas Small Finance Bank 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के ते 9 टक्क्यापर्यंत व्याजदर देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 3.60 टक्के ते 9.11 टक्के व्याजदर देत आहे.
AU Small Finance Bank 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.25 टक्के व्याजदर देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD योजनांवर ज्येष्ठ नागरिकांना 4.00 टक्के ते 9.00 टक्के व्याजदर देत आहे.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना 3.75 टक्के ते 9.25 टक्के व्याजदर देत आहे.