PHOTO : डोक्यावरुन, होडीतून तर कुठे डोहीमधून बाप्पाचं आगमन, कोकणात गणेशाच्या महाउत्सवाला प्रारंभ
अवघ्या कोकणवासियांच्या लाडक्या बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशाच्या आगमनासाठी कोकण सज्ज झालं आहे.
सिंधुदुर्गात काही ठिकाणी होडीतून तर काही ठिकाणी डोक्यावरुन, डोहीमधून लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे.
तर जिल्हात 32 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 67 हजार 952 घरांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे.
घराघरात बाप्पाचं आगमन होत असल्याने कोकणात उत्साहाचे आणि चैतन्याचं वातावरण आहे.
ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने डोक्यावरुन बाप्पाचं आगमन
देवगड तालुक्यात पारंपरिक पद्धतीने डोही बनवून बाप्पाचं घरोघरी आगमन
कुडाळ तालुक्यातील वालावल गावातून खाडीमधून बाप्पाची मूर्ती होडीमधून नेताना
राज्यभरात आज गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष सगळीकडे ऐकायला मिळत आहे.