Royal Enfield लाही देणार टक्कर, 320 सीसीचे पॉवरफुल इंजिन असणारी 'ही' झाली भारतात लॉन्च
हंगेरियन बाईक निर्माता Keeway ने आपली नवीन क्रूझर बाईक Keeway V302C भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय बाजारपेठेसाठी हे ब्रँडचे चौथे उत्पादन आहे. या बाईकची किंमत 3,89,000 ते 4,09,000 (एक्स-शोरूम, भारत) रुपयांदरम्यान आहे. कंपनीने ग्रे, ब्लॅक आणि रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक सादर केली आहे.
Keeway V320c ही ब्रँडची छोटी V-ट्विन बाईक आहे. जी नुकत्याच लॉन्च झालेल्या Keeway K-Lite 250V पेक्षा ही अधिक शक्तिशाली आहे. या दोन्ही क्रूझर बाईकला V-ट्विन सेटअप मिळतो.
Kiway V320c मध्ये 298 cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, 8-व्हॉल्व्ह इंजिन आहे. जे 8500 rpm वर 29.5 bhp पॉवर आणि 6500 rpm वर 26.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
या बाईकला स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Kiway V320c तिच्या किंमत आणि फीचर्समुळे भारतातील सर्वात स्वस्त V-ट्विन सिलेंडर बाईक्सच्या यादीत सामील झाली आहे.
Keeway V320c च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकला वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15-लिटर टीयरड्रॉप फ्युएल टँक, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, फ्लॅट हँडलबार, वर्तुळाकार एलईडी टेल लाईट, ब्लॅक मॅट फिनिश एक्झॉस्ट देण्यात आला आहे.
बाईकच्या पुढील बाजूस इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस स्प्रिंग लोडेड ड्युअल शॉक Absorber आहेत. बाईकमध्ये सिंगल रायडरसाठी लहान सीट आहे.
सुरक्षेसाठी बाईकच्या पुढच्या बाजूला 300 mm आणि मागच्या बाजूला 240 mm चा डिस्क ब्रेक आहे. तसेच बाईकच्या मागे आणि पुढे 120/80-16 आणि 150/80-15 सेक्शन टायर देण्यात आले आहेत.
ही बाईक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS ने सुसज्ज आहे. बाईकचे एकूण वजन 167 किलो आहे.
Keeway V320c ही एक परवडणारी V-ट्विन क्रूझर बाईक आहे. मात्र या किमतीच्या श्रेणीमध्ये, रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 हा ट्वीन-सिलेंडर सेट-अपसह आणखी एक मजबूत दावेदार आहे. रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 फक्त जास्त पॉवर जनरेट करत नाही तर ही बाईक व्हॅल्यू फॉर मनी आहे.