PHOTO : बदलत्या वातावरणामुळे कुडाळमधील पाट तलावाकडे पक्ष्यांची पाठ
राज्यासह कोकणात उष्णता वाढली असून या उष्णतेचा परिणाम जलस्रोतांवर होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पाट तलाव हे पक्षांसाठी नंदनवन म्हणून ओळखलं जातं.
मात्र यावर्षी उष्णेतेमुळे पाट तलावातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.
त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत तलावातील पाणीसाठा उपलब्ध राहिल की नाही याची चिंता पक्षीप्रेमींना सतावत आहे.
या पाट तलावात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी असून पावसाळ्याच्या तोंडावर निघून जातात. मात्र उष्णतेची झळ यावर्षी पक्षांनाही जाणवणार आहे.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने या पाट तलावात देश विदेशातील स्थलांतरित पक्षी येतात.
मात्र यावर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे 10 ते 15 टक्केच पक्षी पाट तलावात दाखल झाले.
मात्र यावर्षी कोकणात तापमानाचा पारा चढला असून याचा फटका पक्षांनाही बसत आहे.
मध्य युरोप आणि आशिया खंडातील पक्षी पाट तलावात सध्या वास्तव्याला आहेत.
यात जांभळी निळी पाणकोंबडी, अडई बदक, खरगोशा यासारखे पक्षी समूहाने शेकडोच्या संख्येने आहेत.