Kunkeshwar Yatra : तळकोकणातील कुणकेश्वर यात्रेत महाशिवरात्रीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री देव कुणकेश्वर यात्रेची प्रथम पूजा यावर्षी पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
मंदिर ट्रस्टने ही माहिती दिली असून महाशिवरात्रीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार असल्याने प्रशासन तयारीला लागले आहे.
कुणकेश्वर मंदिर हे पांडवकालीन पुरातन मंदिर असून याठिकाणी स्वयंभू पिंड आहे.
महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते.
काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते.
श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते.
जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचा आख्यायिका आहे