Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली तात्काळ संरक्षण देण्याची मागणी
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अभिजीत बिचुकलेने धमकीनंतर जीवाला धोका असल्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
आचारसंहितेदरम्यान असा प्रकार घडणं ही गंभीर बाब आहे, असंही बिचुकले म्हणाला.
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
बिचुकलेने कसबा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अभिजित बिचुकलेने उमेदवारी अर्ज भरल्याने ही पोटनिवडणूक खूपच रंजक होणार असल्याचे म्हटले जात आहे.
अभिजित बिचुकले आणि लहुजी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात मंगळवारी निवडणूक कार्यालयासमोर बाचाबाची झाली होती.
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.