Kapil Dev: ' ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कपिल देव त्‍वाडा जवाब नही' , 29 वर्षापूर्वी कपिल देवने केला होता 'हा' विश्वविक्रम

Kapil Dev: कपिल देवने विश्वविक्रम करताच दूरदर्शनने त्याचे प्रसारण बंद केले आणि ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कपिल देव त्‍वाडा जवाब नही हे विशेष गाणे वाजवले.

Feature Photo ( Credit- Getty Images)

1/10
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी, म्हणजे 8 फेब्रुवारी 1994 रोजी कपिल देवने (Kapil Dev) रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला होता. (Image Credit - Getty Image)
2/10
8 फेब्रुवारी 1994 रोजी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात होता. (Image Credit - Getty Image)
3/10
त्या दिवशी कपिल देवला एक अतिशय खास विक्रम नोंदवण्याची संधी होती. (Image Credit - Getty Image)
4/10
कपिल देवची कसोटी क्रिकेटमधील ही 432 वी विकेट होती. त्याने रिचर्ड हॅडलीचा 431 बळींचा विश्वविक्रम मोडला. (Image Credit - Getty Image)
5/10
कपिलने रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडताच संपूर्ण स्टेडियम कपिलच्या सन्मानार्थ उभे राहिले. यानंतर 432 फुगे हवेत सोडण्यात आले. (Image Credit - Getty Image)
6/10
तिथे आणखी एक रंजक घटना घडली. कपिल देवने विश्वविक्रम करताच दूरदर्शनने त्याचे प्रसारण बंद केले आणि ' ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कपिल देव त्‍वाडा जवाब नही' हे विशेष गाणे वाजवले. (Image Credit - Getty Image)
7/10
कपिल देवची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. (Image Credit - Getty Image)
8/10
कपिल भारतीय क्रिकेटचा कर्णधार म्हणून काम केलं आहे. (Image Credit - Getty Image)
9/10
1983 च्या क्रिकेट विश्वचषकात तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. (Image Credit - Getty Image)
10/10
2002 मध्ये विस्डेनने त्याला "भारतीय क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी" म्हणून निवडले. कपिल देवने 10 महिने भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते. (Image Credit - Getty Image)
Sponsored Links by Taboola