Balasaheb Thackeray Birth Annivesary: सिंधुदुर्ग: आगळ्या वेगळ्या कलाशैलीतून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पेश घारे या कलाकाराने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्ताने आपल्या कलाशैलीतून आदरांजली अर्पण केली.
कलर स्प्रेच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांचे 20 फूट आकाराचे चित्र साकारले आहे.
विस्तीर्ण, निसर्ग संपन्न वेंगुर्ले मधील निवती समुद्रकिनारी बाळासाहेबांचे 20 फूट आकाराचे चित्र साकारले आहे.
ही कलाकृती बनवण्यासाठी अल्पेश घारे या कलाकाराल दोन तासाचा वेळ लागला.
संपूर्ण कलाकृती ड्रोनच्या साहाय्याने टिपण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते.
एका ताकदीचे व्यंगचित्रकारापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राजकारणात स्थिरावला.
बाळासाहेब ठाकरे हे कलाप्रेमी होते. राजकारणात उत्तुंग शिखर गाठल्यानंतरही त्यांचे कला क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष असायचे.