In Pics : बाबा महाकालेश्वर मंदिरात पोहोचले भारतीय क्रिकेटर्स, पंतसाठी सूर्यकुमारनं मागितला नवस
सध्या भारत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिसऱ्या वन-डे पूर्वी भारतीय खेळाडू जगप्रसिद्ध अशा बाबा महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचले आहेत.
यावेळी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि भारतीय क्रिकेट संघाशी संबधित काही कर्मचारी दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंनी बाबा महाकालची दिव्य अलौकिक भस्म आरतीला देखील यावेळी हजेरी लावली.
याशिवाय बाबा महाकाल यांची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. खासकरुन सहकारी क्रिकेटर ऋषभ पंतची (Rishabh Pant) प्रकृती लवकर ठीक होवो अशी प्रार्थनाही त्यांनी केली. खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर ओम नमः शिवाय चा जप करताना दिसत आहेत.
याआधीही भारतीय खेळाडू श्रीलंका दौऱ्या दरम्यान अशाप्रकारे पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्याचं दिसून आलं होतं.
भारतीय क्रिकेटपटू अशाप्रकारे पारंपरिक पोशाखात दिसत असून त्यांची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे.
चाहते सतत सोशल मीडियावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ANI वृत्तसंस्थेने खेळाडूंचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे सर्व फोटो तुफान व्हायरल होत आहेत
भारत-न्यूझीलंड मालिकेचा विचार केला असता भारताने 3 पैकी 2 सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
आता तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 24 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता इंदूरच्या होळकर मैदानात खेळवला जाईल.