Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रिगल सिनेमाजवळ असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही मु्ख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी फूट पडल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली.
शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा हा पहिलाच कार्यक्रम होता.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमधील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे, याबाबत निवडणूक आयोग लवकरच निकाल सुनावणार आहे.
सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी प्रलंबित असून पुढील महिन्यात सुनावणीस सुरुवात होणार आहे.