Shakambhari Purnima 2025 : जेजुरी गडावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त फळभाज्यांची आरास; भाविकांची मांदियाळी
जेजुरी गडावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त फळभाज्यांची आरास करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. जेजुरीमध्ये खंडोबासोबत म्हाळसाई आणि बाणाई असल्याने या मंदिरामध्येही आज शाकंभरी उत्सव साजरा केला गेलाय.
त्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आलीय.
पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता. तेव्हा सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती,दरम्यान त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली.
मग शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले.
त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो.
यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या. सदरील आरास नित्य वारकरी, पुजारी वर्ग, कर्मचारी सेवकरी वर्ग यांनी केली.