क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याची पुर्नउभारणी, एकोणीसाव्या शतकातील वाड्याचा जिर्णोद्धार
Satara Savitribai Phule Smarak : सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी क्रांतिकारक बदल घडवून आणले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे यांच्याकडे त्यावेळी नायगावची पाटीलकी होती. नेवसे पाटलांच्या वाड्यात 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईंचा जन्म झाला.
पुढील अनेक वर्षे या वाड्याची दुरवस्था होऊन सावित्रीबाईंच्या जन्माचे ठिकाण विस्मृतीत गेले होते. मात्र, पुन्हा या वाड्याचा जिरृणोद्धार करण्यात आला आणि एकोणीसाव्या शतकात जशी वाड्याची रचना होती, तशा स्वरुपात हा वाडा पुन्हा उभा करण्यात आला आहे.
खंडोजी नेवसे पाटील यांच्या या राहत्या घरी 1840 साली जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले.
1848 साली त्या दोघांनी पुण्यात शाळा उघडून स्त्रिया आणि दलितांना शिक्षणाची दारे खुली केली. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत.
1863 साली स्वतःच्या घरातच 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरु करून अनेक विधवांची बाळंतपणे स्वतः सावित्रीबाईंनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना बहुजनांचे शिक्षण, जातीयता निर्मूलन, सायशोधक विवाह इत्यादी चळवळीत त्यांनी जोतीरावांच्या बरोबरीने कार्य केले.
1890 साली जोतीरावांच्या मृत्यूनंतर या सर्व चळवळीचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आले. 1897 साली प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना खुद्द त्यांनाच प्लेग होऊन त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 रोजी अंत झाला.
क्रांतिज्योति सावित्रीबाईच्या या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या वास्तूची तत्कालीन वास्तुस्वरुपानुसार पुर्नउभारणी करण्यात आली आहे.