Dharavi Accident : ट्रेलर ट्रकच्या जोरदार धडकेमुळे 5 ते 6 वाहने खाडीत, धारावीमध्ये भीषण अपघात
टी जंक्शन परिसरात ट्रेलर ट्रकने 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधारावीमधील टी जंक्शनमधील परिसरात पहाटे अपघात घडला आहे.
ट्रेलरने 5-6 वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे.
सकाळी पावणे 5 वाजेच्या सुमारास एका ट्रेलरने खाडीच्या बाजूला पार्किंगला असलेल्या 5-6 वाहनांना धडक दिली.
ट्रेलरच्या जोरदार धडकेमुळे पाच वाहने खाडीत पडली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघाताग्रस्त ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सध्या स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
अपघाताच्या ठिकाणी सध्या पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान पोहोचले.
खाडीतून अपघातग्रस्त वाहने बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरु आहे.
अपघात एवढा भीषण होता की, मोठा आवाज झाला.
यानंतर अपघातस्थळी स्थानिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.