Satara : हर हर महादेव! शिखर शिंगणापुरात शंभु महादेव यात्रेचा उत्साह
लाखो भविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर (Shikhar Shinganapur) येथील शंभु महादेव यात्रेचा (Yatra) आज मुख्य दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक गडावर दाखल झाले आहेत. हजारोंचा संख्येने कावडी गडावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
शंकराची पत्नी पार्वती यांचा पुनर्विवाह याचं गडावर झाला. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजेच शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे.
शंभु महादेव यात्रेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवल्या जातात.
या कावडीमध्ये महत्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड. गडावर कावडी नाचवत मंदिरच्या दरवाज्याला टेकवल्या जातात.
कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्वतीवर वाहिले जाते. दोन लिंग असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिरं मानले जाते.
दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे.
वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. परंतू, चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते पौणिमापर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात.
या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात. शंभु महादेव हे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे.
शिखर शिंगणापूर हे फलटण पासून 36 किमी अंतरावर तर नातेपुतेपासून 18 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3200 फूट उंचीवर असलेल्या पर्वत रागांवर हे अतिप्राचीन आणि भव्य असे हेमांडपंथी शिवालय मंदिर आहे.