Savitribai phule jayanti 2024 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगावमध्ये भव्य रॅली!
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सव महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो.
यावर्षी थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती आज साजरा केला जात आहे.
महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या विद्यमाने नायगाव खंडाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लोक त्यांच्या या जन्मगावी येत आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगावमध्ये दरवर्षी भव्य रॅलीचं आयोजन केलं जातं
यंदाही रॅलीमध्ये लहान थोरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला!
लहान मुलांनी त्यांची वेशभूषा करून सर्वांची मन जिंकली
यावेळी क्रांती ज्योती स्मारक देखील फुलून गेलं
सावित्रीबाईंचं जन्मघर, तिथं असलेल्या वस्तू पाहायला देखील पंचक्रोशीतून लोकांनी सहभाग नोंदवला