Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : चांदोली धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक
कोयना धरणाबरोबरच चांदोली धरणातील ही पाणीसाठा कमी होत असून सध्या चांदोली धरणात अवघा 4.92 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा साठा जेमतेम एक महिना पुरेल इतकाच आहे. यामुळे आता सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
आता जून महिना निम्मा होत आला आहे. धरणात फक्त 18.12 टक्के पाणी आहे. तसेच अद्यापही कडक उन्हाळा सुरु आहे.
विसर्गामुळे धरणातून आठ दिवसांत सरासरी एक टीएमसी पाणी साठा कमी होत आहे. अशी स्थिती राहिली तर पाणी साठा संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सध्या धरणातून वारणा नदीपात्रात 994 क्युसेक प्रतिसेकंद तर कालव्यात 350 क्युसेक प्रतिसेकंद असा एकूण 1 हजार 344 क्युसेक विसर्ग सुरु आहे.
जून अखेरीस धरणातील जेमतेम शिराळा शहराला पिण्याच्या पाण्याचा एक महिना पुरवठा होईल. मोरणा धरणात 4 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मात्र, यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. मोरणा नदी कोरडी ठाक पडली आहे. मोरणा, अंत्री, धरणातील पाणी साठा कमी झाला आहे.