Dhirendra Shastri : एक वेळ अन्नासाठी वणवण, आता लाखोंची कमाई; पंडित धीरेंद्र शास्त्री यांची संपत्ती ऐकून व्हाल हैराण

Bageshwar Dham Sarkar : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीझोतात आहेत.

Dhirendra Shastri Networth and Income

1/8
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री हे कायम चर्चेत असतात. भूतपिशाच्च दूर करण्याच्या दाव्यामुळे आणि संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
2/8
नेहमीच चर्चेत असलेले धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आधी फार हलाखीची होती. एक वेळेच्या अन्नासाठी त्यांना वणवण करावी लागत होती. याशिवाय त्यांच्याकडे राहण्यासाठी पक्कं घरंही नव्हतं.
3/8
पावसाळ्यामधून त्यांच्या मोडक्या घराच्या छतातून पाणी झिरपत असे. पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील मूळ रहिवासी आहेत.
4/8
सर्व समस्यांचे निराकरण आणि भूत-पिशाच्च दूर करण्याच्या दाव्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. इतकंच नाही तर, यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे.
5/8
धीरेंद्र कृष्णा शास्त्री एक कथावाचक असून लोकांना सर्व प्रकारच्या दु:खापासून दूर करण्याचा दावा करतात. मीडिया रिपोर्टनुसार, पंडित धीरेंद्र शास्त्री सध्या एका महिन्याला सुमारे 3.5 लाख रुपये कमवतात.
6/8
पंडित धीरेंद्र शास्त्री दिवसाला सुमारे आठ हजार रुपये कमवतात, असंही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्या संपत्तीबाबत विविध रिपोर्टमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे.
7/8
कधी भुतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्चांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा, तर कधी पत्रकारांला चॅलेन्ज, यामुळे सध्या बागेश्वर महाराज प्रचंड चर्चेत आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला होता.
8/8
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. त्यांचा जन्म 1996 साली त्यांचा झाला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे.
Sponsored Links by Taboola