पलूसच्या अमनापूर परिसरात पक्ष्यांचा मेळा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य
पलूस तालुक्यातील आमणापूर परिसरात मुक्त विहार करणाऱ्या चित्रबलाक, चमचा, पांढरा कुदळ्या, नदीसुरय, टिटवी, हळदीकुंकू बदक, शेकाट्या यांच्यासह अनेक लहान मोठ्या पक्षांची गर्दी झाली आहे.
Sangli Birds
1/9
यामध्ये लढाऊ विमानासारखा दिसणारा, घिरट्या घालत जमिनीवर उतरणारा, मनमोहक, रूबाबदार चित्रबलाकचे दर्शन मन मोहून टाकते आहे.या पक्ष्याची दृश्ये पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी टिपली आहेत.
2/9
साडेतीन फूट उंचीच्या या चित्रबलाकचे डोके गडद भगव्या रंगाचे, तर त्याच्या तोंडावर पिसे नाहीत. तोंडाचा भाग पिवळ्या रंगाचा आहे. त्याची पिवळ्या रंगाची चोच मोठी, लांब व टोकाकडे किंचित बाकदार असते.
3/9
संपूर्ण अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळे वलयाकार पाहायला मिळत आहेत. छातीवर काळा पट्टा, लांब गुलाबी रंगाचे पाय व शेपटीकडील पिसांचा रंग देखील गुलाबी. हा रंग पाहणाऱ्याचे मन मोहवून टाकणारा आहे.
4/9
या चित्रबलाकला इंग्रजीमध्ये 'पेंटेड स्ट्रोक', संस्कृतमध्ये 'चित्रित महाबक' अथवा 'पिंगलाक्ष' यासह मराठीत 'चाम ढोक', 'रंगीत करकोचा' अशा नावांनी ओळखले जाते.
5/9
चित्रबलाक बरोबरच या डुकरीभाग परिसरात चमच्या पक्षांची संख्यही लक्षणीय आहे. सध्या जुलै ते नोव्हेंबर हा चमच्याचा वीणीचा हंगाम सुरू आहे.
6/9
त्यामुळे या दलदलीत बेडूक, कीटक, पाण वनस्पती, मासोळ्या, खेकडे, गोगलगाय वगैरे खातांना तो हमखास नजरेस पडतो आहे.
7/9
याच्या चमच्या आकाराच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढताना दिसतो त्यामुळं सैरावैरा पळणारे जलचर त्याची सहज शिकार होत आहेत.
8/9
चमच्याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याचा आकार असतो. वीण काळात नराला शेंडी येते. आणि गळ्याखालील भाग पिवळा होतो.
9/9
एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. चमच्या किंवा चमचा हा साधारणपणे ६० सें. मी. आकारमानाचा, बदकापेक्षा मोठा, लांब मानेचा, शुभ्र पांढरा पक्षी असून याचे पाय काळ्या रंगाचे असतात.
Published at : 22 Sep 2024 10:03 AM (IST)