Sangli News : जय जवान, जय किसान! खानापूर तालुक्यातील खंबाळेत एकाच पुतळ्यातून सन्मान!
खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एकाच पुतळ्याच्या रूपातून जवान आणि शेतकऱ्यांचा एकत्रित सन्मान करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे 'जय जवान, जय किसान' हा नारा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरण्याचं काम केलं आहे.
खानापूर तालुक्यातील खंबाळेमधील ग्रामस्थांनी संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.
त्यांनी साकारलेला पुतळा जो शेतकरी आणि जवान यांचा एकत्रित सन्मान करणारा आहे.
पुतळ्याची अर्धी बाजू ही जवानाची असून अर्धी बाजू शेतकऱ्याची आहे .
जवान आणि शेतकरी अशा वेशभूषेतला हा खास पुतळा गावच्या वेशीवर उभारला आहे.
भोवताली 26 /11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो लावून या गावानं शेतकरी आणि जवान शिवाय शहीद पोलिसांचा एक प्रकारे सन्मानच केला आहे.
गावातील तरुणांना सैन्य दलामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे.
तसेच जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकरी देखील तरुणांमध्ये तयार व्हावेत, या एकमेव हेतूने या अनोख्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
जवान आणि शेतकऱ्यांचा एकत्रित सन्मान करणारा हा बहुदा राज्यातील पहिलाच पुतळा असावा.
आमदार अनिल बाबर आणि गावातील सरपंच आणि सर्व सदस्य आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
जय जवान, जय किसान नारा देणारा सांगली जिल्ह्यातील हा पुतळा चांगलाच आकर्षक ठरणार आहे.