Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Fire : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग, जखमींवर उपचार सुरु
साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने कारखान्याला आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाखर कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळ काढला.
आग लागलेली घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणांना मिळताच अग्निशमन दलासह रूग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु, इथेनॉलचे सतत स्फोट होत असल्यामुळे आग भडकत होती.
मात्र, अखेर अग्निशमन दलाला रात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.
इथेनॉल टाक्यांचा मोठा आवाज झाल्याने कर्मचाऱ्यांनी कारखान्यातून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ज्यावेळी इथेनॉलच्या टाक्यांचा स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 32 कर्मचारी कारखान्यात काम करत होते.
स्फोटांचा आवाज आणि आगीचे लोट परिसरात पसरले. त्यामुळे दुर्घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
दरम्यान, या घटनेत दोन कर्मचारी आणि एक टँकर चालक किरकोळ जखमी झाले आहेत.
पंडित नागनाथ काकडे, अशोक अण्णासाहेब गायकवाड, आप्पासाहेब माणिक गोरे (टँकर चालक) अशी दुर्घटनेतील जखमींची नाव आहेत.
दुर्घटनेतील जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.