Sangli News: सांगलीच्या शेतकऱ्याने शोधला काळ्या द्राक्षात नवीन वाण, पेटंटही मिळालं

सध्या शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
असाच एक वेगळा प्रयोग पलूस तालुक्यातील सावंतपूर मधील जयकर माने यांनी केला आहे. प्रयोगशील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांने काळ्या द्राक्षात (Grapes) नवीन वाण शोधून काढला आहे.

ब्लॅक क्वीन बेरी' असे या द्राक्षांच्या नव्या वाणाला नाव देण्यात आलेय. दहा वर्षे वेगळे प्रयोग करून जयकर माने यांनी हा नवीन वाण विकसित केले असून याला दिल्ली नॅशनल रिसर्च सेंटरचे पेटंट ही मिळले आहे.
जयकर माने मागील वीस वर्षांपासून द्राक्ष शेती करतात. या कालावधीत त्यांनी सोनाक्का, सुपर सोनाका, माणिकचमन, कृष्णा, सरिता , काजू अशा द्राक्षांमधील अनेक वाणाच्या द्राक्षांचे उत्पन्न घेतले.
या कालावधीत जयकर माने यांचा द्राक्ष शेतीमध्ये चांगला अभ्यास झाला. तसंच कृषी सेवा केंद्र देखील माने यांनी काही काळ चालवल्यामुळे त्यामध्ये त्यांचा अभ्यास होता.
म्हणून त्यांनी रोगाला बळी न पडणारी आणि बाजारपेठेत मागणी असणारी आणि चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाचे नवीन वाण विकसित करण्याचा प्रयोग 2012 पासून सुरू केला.
सुरुवातीला माने यांनी वेलीच्या एका काडीवर हा प्रयोग करत जंगली द्राक्ष वेलीवर तीन-चार प्रकारचे वेगवेगळ्या वाणाचे डोळे भरले.
यामध्ये ते यशस्वी झाले. अखेर 2018 मध्ये जयकर माने यांना नवीन वाणांच्या विकसित करण्यामध्ये यश आले आणि तीन एकरात त्यांनी नवीन वाणाच्या द्राक्षाची लागण केली.
या वाणाला त्यांनी आपलं कुलदैवत आणि ग्रामदैवत यांच्या नावानुसार आणि इंग्लिश मध्ये नाव असावं या हेतून या नवीन वाणाला ब्लॅक क्वीन बेरी असं नाव दिलं.
15 नोव्हेंबर 2022 रोजी येणार सी कडून देखील या वाणाला पेटंट मिळाले. आज या ब्लॅक क्वीन बेरी या द्राक्षाला इतरांपेक्षा चांगला दर मिळतोय आणि या द्राक्षांची चव बघून त्याला मागणी देखील जास्त असल्याचं जयकर माने सांगतात.