mahalaxmi atta chakki sangli : सांगलीची महालक्ष्मी आटाचक्की चालली अमेरिकेला!
आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत महालक्ष्मी आटाचक्की हा आटाचक्कीचा प्रसिद्ध ब्रँड असून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आणि अर्धा एचपी पॉवरची महालक्ष्मी आटाचक्की डिझाईन करण्यात आली आहे.
ती आता मुंबई आणि पुढे विमानामार्गे अमेरिकेत जाईल.
साधारण 50 ते 70 किलोपर्यंतच्या आटाचक्कीचे आतापर्यंत महालक्ष्मी आटाचक्की समूहात उत्पादन केले जात होते.
अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन आटाचक्कीच्या डिझाईन मध्ये बदल करत वजनात कमी करुन ते जवळपास 22 किलो इतके करून आटाचक्कीचे नवीन छोटे मॉडेल डिझाइन करण्यात आले.
न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती.
न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती.
. त्यांनी महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष माने यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आटाचक्की पाठवण्याबाबत विचारणा केली.
सुभाष माने यांनी देखील आटाचक्की पाठवण्याबाबत तयारी दर्शवली, पण अडचण येत होती त्या आटाचक्कीच्या वजनाची.
तथापि, या ग्राहकाच्या आग्रहाखातर आणि विमानाने अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन 22 किलो वजनाची आटाचक्कीचे मॉडेल डिझाइन करण्यात आले.
उंची 2 फूट आणि रुंदी 1 फूट ठेवण्यात आली आणि अर्धा एचपी पॉवरची मोटर बसवण्यात आली.
ऑर्डर आल्यापासून एक महिन्याच्या आत ही खास आटाचक्की बनवण्यात आली.
अमेरिकेची खास ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला आटाचक्कीच्या दारावर स्थान दिले.