Photo : आज 75 वा भारतीय 'सैन्य दिवस'
भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' (Army Day 2023) साजरा केला जातो. आज 75 वा सैन्य दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. त्यानंतर याच दिवशी जनरल के एम करियप्पा (General K. M. Cariappa) यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आजच्या या सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आजच्या या सैन्य दिनाच्या दिवशी भारतीय जवानांचे कर्तृत्व, देशसेवा, अतुलनीय योगदान आणि बलिदान यांचा गौरव केला जातो.
आजचा दिवस हा भारतीय सैन्य दलाच्या सर्व मुख्यालयात साजरा केला जातो. दरम्यान, मागील वर्षीचा आर्मी डे हा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीनुसार साजरा केला होता.
आजच्या दिवशी देशासाठी बलिदान देणाऱ्या विरांना अभिवादन केले जाते.
यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्यानं आर्मी डे साजरा करण्यासाठी काही नियमावली नसणार आहे. मोठ्या उत्साहात यावर्षीचा आर्मी डे साजरा केला जाणार आहे.
आज सर्व कमांड मुख्यालयासह नवी दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस साजरा केला जातो. यावेळी सैन्य परेड देखील होते.
आजच्या दिवशी भारतीय सैन्याने मिळवलेल्या किंवा सैन्यात सहभागी केलेल्या नव्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं जातं.
भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' (Army Day 2023) साजरा केला जातो. आज 75 वा सैन्य दिवस आहे.