सांगली जिल्ह्यातील शहीद नायब सुभेदार जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप
सांगली जिल्ह्यातील शहीद नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखानापूर गावच्या भगत यांच्या शेतामध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नायब सुभेदार जयसिंग भगत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार, खानापूर घाटमाथ्यावरील हजारो लोक उपस्थित होते.
सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सियाचीन येथे बॉर्डरवर कर्तव्यावर असताना प्रचंड हिमस्खलन होऊन जयसिंग भगत गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
आज पहाटे लडाखहून पुण्यात शहीद भगत यांचे पार्थिव विमानाने पोहोचले.
त्यानंतर लष्कराच्या वाहनातून शहीद भगत यांच्या पार्थिव त्यांच्या खानापूरमध्ये पोहचले.
शहीद जवान जयसिंग शंकरराव भगत यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
यावेळी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.
शासकीय अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला
सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.