Shani Amavasya 2023 : आज शनि अमावस्येनिमित्त जाणून घ्या शनिशिंगणापूरचं महत्त्व आणि आख्यायिका
पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी शनिवार, 21 जानेवारी 2023 रोजी आहे. ही अमावस्या शनिवारी असल्यामुळे याला शनि अमावस्या असं म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजचा म्हणजे शनि अमावस्येचा दिवस शनिशिंगणापूर मंदिरात भगवान शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.
आज देशभरातील असंख्य भाविक या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शनिशिंगणापूरमध्ये येतात. या दिवशी शनि देवाची भव्य जत्रा आणि मिरवणूक काढली जाते.
भारताच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूरची ओळख आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले.
अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रुपात विराजमान आहेत.
येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती 5 फूट 9 इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते.
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करुन तिची पूजा करण्यास प्रारंभ केला.
विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे.
एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोक्यावर वृक्ष पण नाही. शनिदेवाला निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही.
वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनिदेवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.