सांगलीत देशातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी विराट गर्दी!
सांगलीत देशातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी विराट गर्दी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या क्रमांकासाठी थार मिळणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्पर्धा पाहण्यासाठी राज्यभरातून अलोट गर्दी झाली आहे.
बैलगाडी शर्यतीची सुरवात गोमातेच्या पूजनाने करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील भाळवणीमध्ये ही शर्यत होत आहे
या बैलगाडी शर्यतीसाठी आतापर्यंत शर्यतीसाठी कधीही न देण्यात आलेली भव्य अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर आणि इतर विजेत्यांना दुचाकी गाड्या देण्यात येणार आहेत.
या शर्यतीच्या निमित्ताने रक्तदानाचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी एका बैलगाडीच्या नोंदणीबरोबर सहा जणांनी रक्तदान करावं, असा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रेक्षकांचा सारासार विचार करून पट्ट्याच्या दोन्ही बाजूने साईडला प्रेक्षक गॅलरी उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निकालामध्ये कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरासह भव्य स्क्रीनही लावली आहे.