Gautami Patil : कोण आहे 'लावणी क्वीन' गौतमी पाटील?
गौतमी पाटीलच्या बेडगमधील लावणी कार्यक्रमाच्या परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिरज तालुक्यातील बेडग इथल्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लावणी कार्यक्रमात इतकी गर्दी जमली की मैदान कमी पडले.
मग काही प्रेक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला.
शाळेच्या झालेल्या या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. झाडांवर प्रेक्षक बसल्याने अनेक झाडे देखील मोडली.
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे.
आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं.
यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरतिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात.
इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन दिलं जातं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली.
सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती