Big Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या विष-अमृत नॉमिनेशन कार्यात 'हे' सदस्य नॉमिनेट

Big Boss Marathi 4 : बिग बॉसचा मराठी 4 चा खेळ अतिशय रंजक वळणावर आला आहे.

Big Boss Marathi 4

1/9
बिग बॉसने सदस्यांवर विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य (Nomination Task) सोपवले आहे. या कार्यादरम्यान प्रत्येक जो सदस्य पेटारा उघडून त्यातील हिरव्या रंगाचे विष मिळवेल त्या सदस्याला इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी मिळेल.
2/9
बिग बॉसमध्ये झालेल्या विष-अमृत या नॉमिनेशन प्रक्रियेत अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण आणि समृध्दी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.
3/9
नॉमिनेशन प्रक्रियेत नॉमिनेट झालेली अमृता धोंगडे मात्र तेजस्विनीवर तसेच इतर सदस्यांवर नाराज झाली आहे.
4/9
अमृताचे म्हणणे आहे, मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वालिटी निगेटिव्ह आहे की पोसिटीव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे आणि आम्हाला नाही करत याची काय गरज आहे तेजा?
5/9
यावर तेजस्विनी अमृता धोंगडेची समजूत घालताना दिसते.
6/9
दुसरीकडे स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख सोबत बोलताना दिसणार आहे. स्नेहलताचे म्हणणे आहे, "मला चुकीचे निर्णय नाही द्यायचे आहेत. ज्याने एखादा नॉमिनेशन मध्ये येईल.
7/9
घाबरणं किंवा नाही घाबरणं हा प्रश्न नाहीये. मी माझ्या निर्णयाबद्दल साशंक झाले.
8/9
यावर अमृता देशमुख म्हणाली, "तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा."
9/9
आता आजच्या भागात नेमके काय होणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
Sponsored Links by Taboola