आमदार अनिल बाबरांना शेतकऱ्यांनी भेट दिली 'चित्तोडगड'वरून मागवलेल्या ब्राँझ धातूपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती
ब्राँझ (कांस्य) धातूपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती आमदार अनिल बाबर यांना शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार बाबर यांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचे पाणी विटा शहरातील शिवाजीनगर परिसरातील शेतीला मिळाले.
या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
कृतज्ञता म्हणून एक शेतकरी आमदार म्हणून त्यांना काही शेतकऱ्यांनी ही बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली.
आमदारांना भेट दिलेली बैलगाडीची प्रतिकृती सर्वाधिक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब असलेली ही बैलगाडीची प्रतिकृती तब्बल 16 किलो वजनाची आहे.
ही बैलगाडी विमानाने पुण्यात आणण्यात आली.
सत्कार समारंभस्थळी चित्तोडगडवरून आलेली ही बैलगाडी आकर्षण ठरली होती.
ही भेटवस्तू स्वीकारल्यानंतर आमदार बाबर थोडे भावूक झाले.
ही भेट नाही तर माझ्यासाठी हा ठेवाअसल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.