Beed News: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामाचा कार अपघातात मृत्यू
धुळे- सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर क्षीरसागर यांचा मावस भाऊ या अपघातात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
बीड गेवराई रस्त्यावरील धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
धार्मिक विधी आटोपल्यानंतर माणिकराव रायजादे आपला मुलगा प्रतिमसह नाशिकला परत निघाले होते.
अचानक गाडी डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात माणिकराव रायजादे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा प्रीतम रायजादे हा जखमी झाला आहे.
माणिकराव रायजादे हे मारुती सुझुकीच्या ब्रीजा (गाडी क्र. MH 15 GA 7558) गाडीतून प्रवास करत होते.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी क्रेनच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला केली आहे.