Run De Bharti marathon : सांगलीत भारती विद्यापीठाची 'रन दे भारती' मॅरेथॉन संपन्न
सांगलीत भारती विद्यापीठाकडून 'एक पाऊल आरोग्याकडे' या उद्देशाने 'रन दे भारती' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॅरेथॉनमध्ये पंधराशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसनिमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या मॅरेथॉनमध्ये 5 किमी, 10 किमी आणि 21किमी असे तीन टप्पे करण्यात आले होते.
मॅरेथाॅनमध्ये 18 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यत पुरुष, महिला, युवती सहभागी झाले होते.
मॅरेथॉनमध्ये सर्व गटातील नागरिकांसाठी 2 किमीची 'थीम रन' ही एक नवीन संकल्पना नियोजित केली होती.
पहाटे पाच वाजता भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावरुन मॅरेथाॅनला सुरवात झाली.
5 किमीची स्पर्धा भारती हॉस्पिटल ते विश्रामबाग चौक व तेथून परत भारती हॉस्पिटल अशी होती. 10 किमीची स्पर्धा भारती हॉस्पिटल ते राममंदीर चौक व परत भारती हॉस्पिटल अशी तर 21 किमीची स्पर्धा भारती हॉस्पिटल ते गांधी चौक, मिरज ते विश्रामबाग - आयर्विन पुलावरुन परत भारती हॉस्पिटल अशी पार पडली.
प्रत्येक वयोगटानुसार पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले विजेत्यांना असून रोख पारितोषिकेही दिली गेली.
मॅरेथॉन मार्गावर खबरदारी म्हणून स्वयंसेवक, हायड्रेशन सपोर्ट, कार्डियाक रुग्णवाहिकेसह आपत्कालिन वैद्यकीय सेवा पुरवली गेली.
शिवाय भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धेकासाठी रिकव्हरीचीही सोय करण्यात आली होती.