Photo : सावधान! राज्यात 'या' भागात पावसाचा अंदाज
राज्यात सातत्यानं हवामानत बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Wave) तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा नागरिकांना त्रास होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागाकडून (Meteorological Department ) 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (vidarbha) हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी ट्वीट करुन दिली आहे.
सध्या राज्यात थंडीचा कडाका सुरु आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे. अशातच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) थंडीचा जोर अधिक आहे. मात्र, तिथेही हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत आहे. यामुळं वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. म्हणजे राज्यातील वातावरणात सातत्यानं चढ-उताराचा खेळ सुरु आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं चढ-उताराचा खेळ सुरु आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आलं आहे.
हवामान विभागानं मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण या पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पिकांवर वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस पडला तर पिकांचं मोठं नुकसान होण्यची शक्यता आहे.
मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (vidarbha) हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.