Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri News: कोकणात नांगरणी स्पर्धा; गुडघाभर चिखलात सर्जा-राजाचा थरार, पंचक्रोशीतून 40 ते 50 बैल जोड्या सहभाग
पंचक्रोशीतून 40 ते 50 बैल जोड्या सहभाग घेतात ही स्पर्धा कोकणामध्ये नांगरणी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही स्पर्धा पाहण्यासाठी तुफान गर्दी होते. या स्पर्धेत धावण्याचा पहिला मान त्याच गावातील बैल जोडीला दिला जातो आणि त्यानंतर सुरू होतो बाहेरून आलेल्या बैल जोड्यांचा थरार
या स्पर्धेसाठी काही एकरांचे खास शेत तयार केलं जातं.स्पर्धेच्या सुरुवातीला स्पर्धेमध्ये सहभागी होणारे घाटी आणि गावठी बैल जोड्या या मोठ्या शेतातून नांगरसह फिरून या शेतातील मैदानात चिखल केला जातो.
गुडघाभर चिखल झाल्यानंतर याच शेतातील मैदानाच्या मध्यभागी झेंडे लावून दोन भागांत नांगरणी स्पर्धा खेळवली जाते.स्पर्धेत जिल्ह्यातील चाळीस गावठी आणि घाटी बैल जोड्या सहभागी होतात.
सहभागी झालेल्या गावठी जोडीला या स्पर्धेचा पहिला मान दिला जातो.एका मागोमाग एक स्पर्धक आपली बैलजोडी घेऊन या शेतातील मैदानात उतरतो.
घड्याळाच्या कमीत-कमी मिनिटांमध्ये तो मैदानाच्या वेगाने टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो स्पर्धक करतो.या प्रयत्नात काही स्पर्धक या चिखलामध्ये पडतात.
चिखलातून बेभान होणाऱ्या बैलाप्रमाणेच शेतकऱ्याला ही धाव लागत. मग यात चिखलात बैलही त्याला लोळवतात.
अगदी ऑलम्पिकसारखं एका सेकंदाच्या फरकाने घेतल्या बैल जोड्या विजयी होतात. मग गुलाल उडवून सेलिब्रेशनला सुरुवात होते.
गावठी बैलजोडी स्पर्धक संपल्यानंतर त्याच ठिकाणी घाटी बैल जोड्या पळवल्या जातात एका मागून एक स्पर्धक आपली जोडी घेऊन मैदानात उतरतो
नांगरलेल्या शेतात ग्रामस्थ लगेच लावणी करतात.शेतीच्या कामातून थोडीशी उसंती घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसते.