Sri Dev Vetoba : 'श्री देव वेतोबा'ची भव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती, मासुंदा तलावावर ठाणेकरांची गर्दी
ही प्रतिकृती पाहण्यासाठी अनेक ठाणेकरांनी मासुंदरी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही मालिका 17 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील मासुंदा तलाव येथे या मालिकेतील कलाकार निर्माते आणि दिग्दर्शक यांनी प्रसिद्धीसाठी हे पन्नास फुटी वेतोबाची प्रतिकृती उभारली होती.
कोकणातील अनेक प्रथा, परंपरा बाबत गूढ आणि त्याच आकर्षणही पाहायला मिळतं. त्यातीलच एक म्हणजे सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘श्री देव वेतोबा’.
खरं पाहता, वेतोबा म्हणजे भूतनाथ. पण कोकणात संकटकाळात वेतोबा भक्तांच्या हाकेला देवासारखा धावून येतो. यामुळे वेतोबाला देवाचं स्थान आहे.
आता ‘श्री देव वेतोबा’ ची कथा मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे.
मालिकेच्या प्रमोशनसाठी ठाण्यातील मासुंदा तलाव येथे श्रीदेव वेतोबाची एक भव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
श्री देव वेतोबाची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी ठाणेकरांनी चांगलीच गर्दी केली आहे.
यावेळी मासुंदा तलावावर मालिकेतील कलाकारांचीही हजेरी पाहायला मिळाली.