Rain : उत्तर भारतात पुरामुळं जनजीवन विस्कळीत, पाहा फोटो
सध्या उत्तर भारतात (North India) मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह (Himachal pradesh) अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्ते बंद झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुरामुळं मोठं नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमध्ये पुढील तीन दिवस म्हणजे रविवार (16 जुलै), सोमवार (17 जुलै) आणि मंगळवार (18 जुलै) मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
यमुनेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं दिल्ली भीषण पुराच्या तडाख्यात आहे. देशातील 12 राज्यात पुरामुळ गंभीर स्थिती निर्माण झाली आहे
पंजाब आणि हरियाणामध्ये देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.